HW News Marathi
महाराष्ट्र

दिल्ली-पुणे विमानात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण, पुण्यात उपचार सुरु

पुणे | जगभरात काेराेना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये आतापर्यंत करोनाने ६१८ जणांचे बळी घेतले आहेत. आज (७ फेब्रुवारी) दिल्लीवरून पुण्याला आलेल्या एअर इंडियाच्या विमानात एका चीनी प्रवाशाने विमानात उलटी केल्यामुळे इतर प्रवाशांनी प्रवास करण्यासाठी नकार दिला. या संशयित चीनी प्रवाशाला पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल केले आहे. खबरदारी म्हणून त्या प्रवाशाच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्या प्रवाशांची त्याची तपासणी करण्यात येत आहे.

चीनमधील वुहान येथून या व्हायरसची लागण होण्यास सुरुवात झाली असून चीनमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना चिनी नागरिकाने उलटी केल्याने त्यालाही लागण झाली असल्याची भीती वाटली आणि त्यांनी प्रवास करण्यास नकार दिला. दरम्यान विमान पुण्यात उतरल्यानंतर खबरदारी म्हणून त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या विमानाने दिल्लीला उड्डाण केले. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले २२ प्रवासी आजपर्यंत करोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिल्यानंतर निरिक्षणाखाली असणाऱ्या या प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडला! – रवी राणा

Aprna

‘हायकोर्टाचा राज्यपालांना फटका’, 12 आमदारांच्या निर्णयाची दिली जाणीव!

News Desk

‘त्या’ तीन गोष्टी केल्याशिवाय ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही, शरद पवारांचं भाष्य!

News Desk