नवी दिल्ली | महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. दिल्ली सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या महाराष्ट्रास ५ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना करोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यावरच दिल्लीत प्रवेश देण्याचा निर्णय केजरीवाल सरकारनं घेतला आहे.
दिल्ली सरकारने महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यातून येणाऱ्या नागरिकांकडून करोना निगेटिव्ह रिपोर्ट असल्यावरचं दिल्लीत प्रवेश करू देण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे.या राज्यांमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत इतर राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या तीन लाटांमधून बाहेर पडलेल्या दिल्लीत पुन्हा करोना बळावू नये, यासाठी केजरीवाल सरकारनं विषाणूला वेशीवर रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
Travellers from Maharashtra, Kerala, Chhattisgarh, Madhya Pradesh and Punjab will need a negative coronavirus test report to enter #Delhi from 26th February till 15th March
— ANI (@ANI) February 24, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.