मुंबई। राज्यातील करोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे कमी झालेला नसताना, आता डेल्टा प्लसच्या रूग्ण संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात डेल्टा प्लसचे दहा नवीन रूग्ण आढळून आले आहे. तर, यामुळे आता राज्यभरातील एकूण रूग्ण संख्या ७६ झाली आहे.
राज्यात आज आढळळेल्या डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये कोल्हापूर – ६, रत्नागिरी – ३, सिंधुदुर्ग – १ या रूग्णांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत आढळून आलेल्या ७६ रूग्णांपैकी पाच रूग्णांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.
Ten new cases of Delta Plus variant found in Maharashtra – six in Kolhapur, three in Ratnagiri and one in Sindhudurg, taking the total number of cases in the state to 76. Five of these 76 patients, have died: State Health Department
— ANI (@ANI) August 16, 2021
पुण्यात पहिला रुग्ण
‘डेल्टा प्लस’ बाधितांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून यात रत्नागिरीतील दोन, तर मुंबई, बीड आणि रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लसने मृत्यू झालेले पाचही रुग्ण ६५ वर्षांवरील होते आणि त्यांना अतिजोखमीचे आजार होते. या पाच जणांपैकी दोन जणांनी कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या होत्या, तर दोघांनी कोणतीही लस घेतेलेली नव्हती. मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या लसीकरणाबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.