HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे एकजुटीचे शक्तीप्रदर्शन

मुंबई। शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकासआघाडीने १६२ आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपने बहुमत नसतानाही राज्यात सत्तास्थापन केली आहे. मात्र, काल (२५ नोव्हेंबर) मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे तिन्ही पक्षांच्या आमदारांनी शक्तीप्रदर्शन केले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व आमदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहू, आम्ही भाजपला फायदा होईल असे कोणतेही कृत्य करणार नाही, अशी शपथ महाविकासआघाडीचे १६२ आमदारांना देण्यात आली आहे.

यावेळी १६२ पैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार काही कारणास्तव अनुपस्थित होते. त्यापैकी सर्वोच्च न्यायालयाने सुरु असलेल्या सुनावणीसाठी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत आहेत. राष्ट्रवादीचे बेपत्ता आमदार नरहरी संध्याकाळी दिल्लीत होते. ते विमानाने मुंबईत आले.भाजपकडे बहुमत नसताना त्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. हॉटेल ग्रॅण्ड हयात येथील महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. तसेच यावेळी आमदारांचे एकत्र फोटोसेशन करण्यात आले, ओळख परेडही झाली. ओळख परेड पार पडल्यानंतर उपस्थित सर्व आमदारांना आणि नेत्यांना एकजुटीची शपथ देण्यात आली.

राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचे पत्र देऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते पत्र ग्राह्य धरू नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आमच्याकडे १६२ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना १६२ आमदारांच्या समर्थनाचे पत्रदेखील दिलेआहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातंय! देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणावर?

News Desk

“…तर उद्धव ठाकरेही बेईमान झाले नसते”, शिवसेना नेत्याचं फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

महाराष्ट्राचं नेतृत्व एका चांगल्या हातात आहे, ग्रामपंचायत निवडणुकीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

News Desk