HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिल्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगभरातील मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आपल्या काव्यप्रतिभेनं मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन राज्यातील जनतेला, जगभरातील मराठी भाषाप्रेमींना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिल्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा”, अशा शब्दांत अजित पवारांनी आज (२७ फेब्रुवारी) जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार म्हणाले कि, “अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार आहे. मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी आहे. मराठीला हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता माळी, संत नरहरी सोनार यांच्यासारख्या संतांनी त्यांचे अलौकिक विचार मराठी भाषेत मांडले. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी त्यांच्या साहित्यकृतींतून मराठी भाषा समृद्ध केली. गावखेड्यातल्या बोलीभाषांनी मराठीचे सौंदर्य अधिक वाढवले. आज बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी देशात तिसऱ्या आणि जगात दहाव्या क्रमांकावर आहे.”

“मराठी ‘ज्ञानभाषा’ झाली पाहिजे. मराठीची उपयोगिता वाढली पाहिजे. जागतिक स्तरावर संपर्क, संवाद, व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळालं पाहिजे. संगणकाच्या आज्ञावली मराठीत विकसित झाल्या पाहिजेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच औद्योगिक, आर्थिक, न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकानं स्वत:पासून वैयक्तिक जीवनात, व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करुन करावी”, असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोवालांवर आरोप करत देशमुखांचे ‘फेसबुक लाईव्ह’ रद्द, राजकीय वर्तुळात चर्चा

News Desk

मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात !

News Desk

मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच! 

News Desk