HW News Marathi
महाराष्ट्र

कार्तिकी एकादशीनिमित्ताने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापुजा संपन्न

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीनिमित्ताने (Kartiki Ekadashi) श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी सपत्नीक आज (4 नोव्हेंबर) पहाटे तीन वाजताच्या सुमारास महापूजा करण्यात आली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड गावातील उत्तमराव साळुंखे आणि पत्नी कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.

फडणवीस म्हणाले, “मला विठूमाऊलीची पुजा करण्याची संधी मिळाली असून हा माझ्यासाठी अतिशय भाग्याचा योग असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सामान्य माणसांचा, शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा देव आहे. यामुळे आयुष्यात चांगले दिवस यावे. आणि सर्वांचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावे. हे कार्य करण्याची आम्हाल शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केली, असे त्यांनी सांगितले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावे. वारकरी, भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना करून उपमुख्यमंत्र्यांनी भूसंपादन करताना, निकषाच्या बाहेर जाऊन बाधितांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही गुरुवारी येथे दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंबिल ओढ्यातील नागरिकांशी संवाद, सुप्रिया सुळेंसमोरच अजित पवार मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

News Desk

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, प्रताप सरनाईकांच्या पत्रावर मनसेचं सूचक ट्विट

News Desk

देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा घट, सक्रिया रुग्णसंख्याही खाली!

News Desk