HW News Marathi
देश / विदेश

‘अमित शाह संसदेत आले, तर मी टक्कल करेन’, देरेक ओब्रायनचं अमित शहांना आवाहन

नवी दिल्ली | संसेदचं पावसाळी अधिवेशन अनेक कारणांसाठी गाजत आहे. पेगॅसस, कृषी कायदे आणि आसाम-मिझोराम संघर्षासह विविध मुद्द्यावरून संसदेत गदारोळ बघायला मिळत आहे. आता दिल्लीत घडलेल्या घटनेचे पडसाद संसदेत उमटण्याची चिन्हं आहे. दिल्लीतील या घटनेवरून तृणमूल काँग्रेसचे खासदार देरेक ओब्रायन यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर आव्हान दिलं आहे. जर अमित शाह यांनी संसदेत येऊन निवेदन दिलं, तर टक्कल करून येईन”, असं ओब्रायन म्हणाले आहेत.

आधी पेगॅससच्या मुद्द्यावर चर्चा करायची

पेगॅसस वरून विरोधक केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत. संसदेत पेगॅसस विषयावरून विरोधकांमध्ये वादावादी सुरु आहेत. ओब्रायन म्हणाले,”विरोधकांची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला संसदेत चर्चा हवी आहे. आम्हाला तीन मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. कृषी कायदे, अर्थव्यवस्था, रोजगार, महागाई आणि राष्ट्रीय सुरक्षा (पेगॅसस). सर्वात आधी पेगॅससच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे”, असं ओब्रायन म्हणाले आहेत.

”जर अमित शाह आज (४ ऑगस्ट) राज्यसभा वा लोकसभेत आले आणि सामूहिक बलात्काराच्या घटनेवर निवदेन केलं, तर मी टक्कल करून तुमच्या कार्यक्रमात येईन. मी अमित शाह यांना आव्हान देतोय, कारण ते पेगॅसस प्रकरणाच्या चर्चेपासून पळ काढत आहेत”, असं ओब्रायन म्हणाले आहेत.

मोदींनी संसदेत किती प्रश्नांना उत्तरं दिली आहेत?

“ही संसद आहे आणि इथे संसदेच्या नियमांप्रमाणेच चालावं लागेल. गेल्या सात वर्षात भाजपा सरकारनं फक्त ११ टक्के विधेयकांची पडताळणी आणि चर्चा केली आहे. युपीएच्या काळात हेच प्रमाण ६० ते ७० टक्के होतं. जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री दिल्लीत आले, तेव्हा त्यांनी हे प्रमाण २५ टक्क्यांवर आणलं आणि आता ११ टक्के आहे. २०१६ पासून मोदींनी संसदेत किती प्रश्नांना उत्तरं दिली आहेत? त्यांना संसदेत त्यांचे नियम बनवायचे आहेत. विरोधकांना चर्चा हवीये”, असंही ओब्रायन म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Aprna

#SushantSinghRajput : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकीय नेत्यांनीही व्यक्त केली हळहळ

News Desk

“उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाला नेमकं काय लपवायचंय ?”, राज ठाकरेंचा संतप्त सवाल

News Desk