HW News Marathi
Covid-19

“काही राज्यात निवडणुका असतानाही तिथे रुग्णसंख्या कमी”, फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोमणा  

नागपूर | राज्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नागपूरमध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाढणार की नाही याबाबत आज (२० मार्च) महत्त्वाचा निर्णय होणार आहे. नागपूरमधील कोरोनाआणि लॉकडाऊनबाबत आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत. “लॉकडाऊन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाऊन केले आहे, प्रशासनाला वाटत असेल लॉकडाऊन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीआधी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीला हजेरी लावण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, “नागपुरात मोठ्या प्रकरणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या दोन तीन दिवसात मृत्यू संख्यादेखील वाढत आहे. या अनुषंगाने नागपुरात आज पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही या बैठकीला आलो आहे, तात्काळ काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने या बैठकित चर्चा केली जाणार आहे”.

विशेषतः रुग्णसंख्या वाढत असताना ज्यांना रुग्णालयाची गरज आहे त्यांना बेड्स उपलब्ध झाले पाहिजे. रुग्णालयाच्या बिलाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढं आला आहे. यावर सोल्यूशन या बैठकीत काढलं जाईल. जे काही जनतेसाठी करता येईल ते करू. लॉकडाऊन हा पर्याय नाही, मात्र सात दिवस लॉकडाऊन केले आहे. प्रशासनाला वाटत असेल लॉकऊन लावले पाहिजे तर आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. मात्र त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. देशातल्या इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मी यातला तज्ज्ञ नाही, मात्र काही राज्यात निवडणुका असतानाही तिथे रुग्णसंख्या कमी आहे. महाराष्ट्रात लसीकरण संथ गतीने सुरू आहे, ही गती वाढविली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांच्या घरात, कोरोनाबळीही घट

News Desk

बच्चन यांना कोरोनाची लागण तर अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील !

News Desk

पुणेकरांना दिलासा | पुण्यात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार, महापौरांची घोषणा

News Desk