HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीबद्दल राजकीय वर्तृळात रंगल्या चर्चा

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (२१ एप्रिल) भेट घेतली आहे. काल (२० एप्रिल) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज लगेचच फडणवीसांनी घेतलेली राज्यपालांची भेट ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्यात कोरोनाची असलेली स्थिती, रुग्णांची संख्या, तसेच गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये दोन साधूंच्या झालेल्या हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेच्या नेमणुकीबाबत देखील चर्चा झाली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे.

Related posts

के. जी. बोपय्या यांच्या अध्यक्षतेखाली बहुमताची चाचणी

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाकडून आरेतील मेट्रो कारशेडला हिरवा कंदील

News Desk

डीएसकेंच्या जामीनीवर आज सुनावणी

News Desk