मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासाठी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरले आहेत. फडणवीस यांनी ट्विट करुन अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली. अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरु आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
While deciding on the matter today, it is our humble request to the Hon High Court to take suo moto cognizance of the way MVA State Government in Maharashtra has treated Arnab Goswami during the entire process of arrest to handling under custody, as alleged by him.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2020
तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने आज (९ नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीत अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीची अर्ज फेटाळला आहे. जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार असून सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावे लागणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.