HW News Marathi
देश / विदेश

अजित पवार -देवेंद्र फडणवींसाचा वाढदिवस एकत्र असला तरी राजकीय सूर एकत्र का नाहीत ?

मुंबई | २२ जुलै, दोन दिग्गज नेत्यांचा वाढदिवस. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तर दुसरीकडे भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस .अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव डोळ्यासमोर येताच आठवतो तो राजकारणातला एक महत्वाचा दिवस. २३ नोव्हेंबर, २०१९. पहाटेच एक बातमी आली की अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भवनात भल्या पहाटे झालेला हा शपथविधी राजकीय इतिहासात नक्कीच कोरला गेला. ८० तासांच्या या सरकारमुळे राजकीय चळवळींना उधाण आलं होतं. त्यानंतर जे काही घडलं त्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत.योगायोग म्हणजे, सगळ्यांना चकवा देणारं सरकार बवनणाऱ्या या दोघांचा वाढदिवस ही एकाच दिवशी येतो.

वाढदिवस एक असला तरी स्वभाव मात्र वेगळे !

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा जन्म जरी एकाच दिवशी असला तरी स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे. जिथे एकीकडे दोघे सरकार बनवणार होते तिथे आता तेच एकमेकांच्या विरोधात आहेत. देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत तर अजित पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या स्थानी आहेत. फडणवीस हे राज्याचे ‘यंग’ मुख्यमंत्री होते.तर अजितदादांच्य वाट्याला मुख्यमंत्रीपद काही आल नाही.भाजप कडून देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवल्या आणि ते विजयी ठरले. तर दुसरीकडे, घरातच राजकारणाचा वारसा असलेले अजित पवार हे त्यांच्या काकांच्या म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन राजकारणात आले आणि त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली.अजित पवार हे नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि वागणुकी साठी प्रसिद्ध आहेत. ‘अंगावरती आलं तर शिंगावर घेऊ’ हा स्वभाव अजित पवारांचीआहे. तर नरेंद्र मोदी यांच्या पक्षात निष्टेने काम करणारे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वेळ आली कि बेधडक होऊन आपलं मात मांडतात. राजकारण म्हंटलं कि वादविवाद, हेवेदावे हे येतातच पण हे सगळं विसरून एकत्र येणं हे पण विशेषच.

राजकीय यश अपयश

राजकारणाचा वारसा घरात असल्यामुळे अजित पवार यांच्या साठी राजकारणात येणं काही नवल न्हवतं.महाराष्ट्रातील ज्या काही वादग्रस्त राजकारण्यांची नावे घेतली जातात त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख येतोच.वादग्रस्त असलेले दादा महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेतं.’दादा’ अशी ओळख असलेल्या अजित पवारांची राजकारणातही प्रेमळ दादागिरी चालते. त्यामुळेच त्यांच्या कामांपेक्षा राजकारणात वादग्रस्त वक्तव्यांमुळेच त्यांची जास्त ओळख आहे. अजित दादांनी एखादे वादग्रस्त वक्तव्य केले की,लगेच सावरायला नेहमी त्यांचे काका म्हणजेच शरद पवार धाव घेतात. तर देवेंद्र फडणवीस हे तडफते राजकारणी म्हणून ओळखले जात. अगदी कमी वयात त्यांनी बरंच काही यश मिळवलं आहे. कुशल युवा राजकारणी, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु वृत्ती, आर्थिक धोरणांसह अनेक विषयांचा त्यांचा हातखंड आहे. नगरसेवक, सगळयात कमी वयाचे महापौर, आमदार, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि २०१४ पासुन मुख्यमंत्री पदाची धुरा फडणवीसांवर सांभाळली. वडील जरी राजकारणात होते तरी, आपली स्वतःची ओळख ही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या वरदहस्ताने अजित पवार राजकारणात आले असले तरी अजित पवारांनी आपला ठरला पक्षात नाही तर महराष्ट्रात उमटवलाय.

अशा या दोन दिग्गज राजकारण्यांचा आज(२२ जुलै) वाढदिवस आहे. कार्यकर्त्यांना सांगून सुद्धा त्यांनी होर्डिंग लावून आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करायचा असं ठरवलं आहे. राष्ट्रवादू पक्षाकडून अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना मदत करण्यात येणार आहे. भाजपकडून रक्तदान शिबीर आणि इतर कार्यक्रम राबवले जाणारेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : गेल्या २४ तासात देशात ९५७ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

News Desk

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही कायम

News Desk

#PulwamaAttack : भारताने पाकिस्तान उच्चायुक्तांना समन्स बजावले

News Desk