HW News Marathi
महाराष्ट्र

“मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं?”, फडणवीसांचा सवाल

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या (२ एप्रिल) फेसबूक लाईव्हवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली आहे.

राज्यात कोविड वाढत आहे. त्यामुळे पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहोत हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, हे सांगणं अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काल केवळ विरोधकांवर टोलेबाजी करण्यात आणि टीका करण्यात वेळ घालवला. कालचं भाषण काय होतं? कशासाठी होतं? हेच कळलं नाही. कारण त्यात ना कोरोना वाढण्याबाबत भाष्य करण्यात आलं, ना उपाययोजनांची माहिती देण्यात आली, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

नियम होता कामा नये

लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. अपवादात्मक स्थितीत लॉकडाऊन करावा लागतो. पण तो नियम होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकाचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवं. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, त्या देशांनी काय पॅकेज दिलेत हे सुद्धा पाह्यलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

राज्यावर करोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट ओढावलं असून, मागील काही दिवसांपासून डोळे विस्फरायला लावणारी आकडेवारी समोर येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य आहे, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार शशिकांत वारिशे हत्याप्रकरणी अजित पवार सभागृहात आक्रमक; म्हणाले…  

Aprna

विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, देशात ४ लाख ऑक्सीजन बेड उभारणार’

News Desk