मुंबई । तौक्ते चक्रीवादळामुळे बसलेल्या ताडाख्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ३ दिवसांचा कोकणातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त देवेंद्र फडणवीस पाहणी करणार असून या ३ दिवसीय दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. याचसोबत फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची देखील मागणी केली आहे. फडणवीस आज (१९ मे) रायगड, गुरुवारी (२० मे) रत्नागिरी, तर शुक्रवारी (२१ मे) सिंधुदुर्ग येथील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतील.
देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, “गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्त भागांसाठी राज्य सरकारने जी मदत जाहीर केली ती तोकडी होतीच आणि ती मदत मिळालीही नाही. आता यंदा तौक्ते चक्रीवादळानंतर तरी नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
गेल्याही वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोकणातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला होता. मात्र, त्यावेळी जाहीर करण्यात आलेली मदत अगदीच तुटपुंजी असून तेवढी मदतही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, अशी टीका आता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
प्रवीण दरेकरांची टीका
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर आता सरकारमधील मंत्री मदतीची वक्तव्य करू लागले आहेत. प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवून चालत नाही. राज्य सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही?” असा सवालही यावेळी प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.