मुंबई | राज्यात एकीकडे अनेक मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. अशात अनेक नेत्यांच्या गाठीभेठी सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. खासदार संभाजीराजे यांनी नुकतीच अनेक दिग्गज नेत्यांची या संदर्भात भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (३१ मे) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रववादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
फडणवीस आणि पवार यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करत शरद पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तुर्तास तरी या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. मात्र, तरीही राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात आहे.
Met Former Union Minister & Senior leader Shri Sharad Pawar ji at his residence in Mumbai this morning. This was courtesy meeting.
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/eqjabCHMh7— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 31, 2021
नुकतीच संभाजीराजे यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्दव ठाकरे या सगळ्यांची भेट घेत मराठा आरक्षण परत मिळवण्यासाठीचे काही पर्याय सांगितले होते. ते सगळ्यांनी मान्य केल्याचंही संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं. त्यामुळे या पर्यायावर फडणवीस आणि पवार यांच्यात चर्चा झाली असेल का असंही बोललं जात आहे.
शरद पवार-संभाजीराजे भेटीमध्ये काय झालं ?
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप खासदार संभाजीराजे हे देखील आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी काल (२७ मे) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सकारात्मक झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नारायण राणे या सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा”, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.