HW News Marathi
महाराष्ट्र

अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा चुकीच अर्थ काढू नका – देवेंद्र फडणवीस

नाशिक | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन विरोधी पक्षनेतेपद देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर. या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट हे सुशांत सिंह राजपूत यांच्याविषयी आहे. या ट्विटचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये”, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केले आहे.

“मुंबई सुरक्षित आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. पण सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जनतेला उत्तर हवे आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. “राज्य सरकार बिहार पोलिसांना त्यांचे कर्तव्य न बजावू देता अनावश्यक संशयाच्या भोवऱ्यात का पडत आहे, हे खरोखरच विचित्र आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

केरळमधील वैद्यकीय पथकाने मुंबईला भेट दिली. उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आले. बिहार पोलिसांची एक टीम आधीच चार दिवसांपासून मुंबईत कार्यरत आहे. पण त्यापैकी कुणालाही अडचणीत आणलं गेलं नाही. पण फक्त बिहारच्या पोलीस अधिक्षकांनाच का वेगळी वागणूक दिली जात आहे?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.अशा प्रकारच्या वागणुकीमुळे सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याऐवजी लोकांच्या मनात संशय आणि अविश्वासच निर्माण होईल”, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर करत म्हटले आहे.

दरम्यान, अमृता फडणवीसांच्या ट्विटला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली. “मुंबई पोलिसांवर आरोप करुन बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हान करु इच्छिते की, त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी मुंबई पोलिसांची सुरक्षा सोडावी. त्यांनी खासगी सुरक्षा एजन्सींकडे जावं, जिथे त्यांना सुरक्षित वाटेल. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने अशाप्रकारचं वक्तव्य करणं लाजिरवाणं आहे”, असा घणाघात प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार

News Desk

भेंडवळची भविष्यवाणी : यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस, देशात स्थिर सरकार येणार !

News Desk

#CoronaVirus : शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ‘कोरोना’विरुद्ध लढाई जिंकणारच !

swarit