HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू – देवेंद्र फडणवीस 

नाशिक | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल. त्यानंतर फेसबुकवर त्यांनी करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. नाशिकमध्ये जेष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याती आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचं सांगितलं आहे. असं संशयाचं वातावरणं राहणं योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदर्भातील सत्य बाहेर आणावं. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आलं की, आम्ही आमची मागणी करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Related posts

विद्यार्थी भारती संघटनेच्या मुलींनी केले शॉर्ट ड्रेस घालून आंदोलन

News Desk

बजरंग दलाचे सर्मथक, कन्हैया कुमारमध्ये हाणामारी

अपर्णा गोतपागर

सुशीलकुमार शिंदे माझ्या पक्षासंदर्भात हे बोलू शकत नाहीत !

News Desk