HW News Marathi
महाराष्ट्र

बेईमानी करून आलेले सरकार पडले की आम्ही पर्याय देऊ, मनसेच्या युतीवर फडणवीसांचे उत्तर

सोलापूर | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर विरोधकांच्या त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे. शिवेसना खासदार संजय राऊत टीका करण्याशिवाय दुसरं काय करणार, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

तसेच, गेल्या काही दिवसांपासून मनसे भाजपसोबत येणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे बेईमानीने आलेले सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षकमतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अवकाळी पाऊसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत, निसर्ग चक्रीवादळ, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई, निसर्ग चक्रीवादळ आणि वाढीव वीजबिलांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

चंद्रकंत पाटील काय म्हणाले होते?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवर तळमळीनं रिऍक्ट होतात. पण आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचं धोरण बदलायला हवं. त्यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असं पाटील म्हणाले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबदल दुमत नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला

News Desk

मुलांनी आईची केली हत्या ?

News Desk

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक, काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर 

News Desk