HW News Marathi
महाराष्ट्र

MPSCExam : विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होतंय, फडणवीस सरकारवर भडकले

मुंबई | गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. MPSC च्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावरुन आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचे आणखी एक कारण मिळाले आहे. महत्वाचं म्हणजे, या निर्णयाविरोधात महाविकासआघाडी सरकारमधीलच काही नेत्यांनी निषेध केला आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आता या निर्णयाचा निषेध केला आहे. ‘एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा!’,असे ट्विट फडणवीसांनी केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे आणि विजय वडेट्टीवार यांनीही परिक्षा झाल्याच पाहिजे असा निर्धार केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Aprna

तर पोलीस महासंचालक नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील, जितेंद्र आव्हाडांची टीका 

News Desk

घोटाळ्यात चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे पुढे काय होते !

News Desk