HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक

औरंगाबाद | एकीकडे कोरोनामूळे धुमाकूळ आहेच तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणूकीने राजकीय वर्तृळात चर्चा सुरु आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये धुसफूस सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत बैठक घेतल्याचे समोर आले आहे.

मुंबईहून नागपूरला जाताना फडणवीस यांनी औरंगाबादेतील नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीला औरंगाबाद शहरातील राज्य पातळीवरील नेते उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर ही बैठक झाल्याने या बैठकीला एक वेगळेच महत्व आले आहे. या बैठकीत भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर चर्चा झाली असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी स्वत:ही भाजपने तिकीट न दिल्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ही बैठक घेतली असेल असे म्हटले जात आहे. मात्र, अजुन नेमकी या बैठकीत काय चर्चा झाली ते गुलदस्त्यात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थोड्याच वेळात होणार आर्यन खानची तुरुंगातून सुटका

News Desk

रोहीत पवारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रातून केली ‘ही’ मागणी 

News Desk

खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली-अजित पवार

News Desk