HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का?, फडणवीसांचे आदित्य ठाकरेंवर शरसंधान

मुंबई | रायपूर येथील सरकारी अधिकाऱ्यानं नागपूरात येऊन केलेली आत्महत्या आणि दादरा नगर हवेलीचा भाजप खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येवरुन राज्याच्या विधानसभेत आज (९ मार्च) जोरदार गदारोळ झाला. भाजपचं प्रशासन असलेल्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन आत्महत्या करत आहेत आणि महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल या आशेनं आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सुसाईड नोटमध्ये करत आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी रायपूर मध्य प्रदेशात येत असल्याचा उल्लेख केला.

देशमुखांच्या याच दावाच्या धागा पकडून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार शरसंधान केलं आहे.”राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करुन घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील जनता-विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, सोनियांची भाजपवर टीका

News Desk

परळीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा एल्गार!

News Desk

‘माकडवस्थेत’ जाऊन झाडावरची पानं – फुलं खाऊन जगावं की काय? रुपाली चाकणकरांचा सवाल

News Desk