HW News Marathi
महाराष्ट्र

हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत, फडणवीसांचा खरमरीत टोला

उस्मानाबाद | सत्ताधारी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सध्या राज्यात पावसाने केलेल्या नुकसानीवरून वाद सुरू आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या उस्मानाबाद येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस आज (२० ऑक्टोबर) उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला

“राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. सरकारने मदतीबाबत आता कुठलेच बहाणे सांगू नये. मला आश्चर्य वाटतं, या तीन पक्षांमध्ये खूप मतभेद आहेत. पण एका बाबतीत सगळे मात्र एका सूरात बोलतात की, केंद्राने मदत करावी. त्यामुळे हात झटकण्यात तीनही पक्ष तरबेज आहेत”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.यावेळी त्यांनी राज्य सरकावर निशाणा साधला.

“केंद्र सरकार शेतकऱ्यांना निश्चितच मदत करेल. पण राज्य सरकारनेदेखील काय मदत केली पाहिजे ते ठरवलं पाहिजे”, असं फडणवीस यांनी सुनावलं आहे. “तुम्ही राजकीय बोललात तर मीदेखील राजकीय बोलेल. मी काल दिवसभर काहीच राजकीय बोललो नाही. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, यावर भाष्य करण्याची अपेक्षा आहे”, असे फडणवीस म्हणाले आहेत..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नाचता येईना अंगण वाकडं’, प्रवीण दरेकरांची अशोक चव्हाणांवर खोचक टीका

Jui Jadhav

खंडाळ्यात एक्स्प्रेसवर दरड कोसळली

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल

Gauri Tilekar