HW News Marathi
महाराष्ट्र

विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम, बाळासाहेबांना आदरांजली वाहत फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला 

मुंबई | हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) आठवा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने बाळासाहेबांच्या आठवणींना राजकीय नेत्यांकडूनही उजाळा दिला जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मात्र या शुभेच्छा देताना फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.“आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन..”, असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचा फोटो ट्विट करत म्हटलं आहे.

तर अन्य एका ट्विटमध्ये फडणवीस यांनी बाळासाहेबांबद्दल बोलतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला फडणवीस यांनी बाळासाहेबांचा उल्लेख, “विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम,” असा केला आहे. या कॅप्शनच्या माध्यमातून फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. बिहार निवडणुकींमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रामधील शिवसेना- भाजपची युती तुटल्यासंदर्भातील चर्चा पुन्हा होऊ लागल्या. मागील वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वाटपावरुन भाजप शिवसेनेत पडलेली फूट ही दिलेला शब्द न पाळल्याचे झाल्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता फडणवीस यांनी पुन्हा एकदा, “विधानांवर ठाम” असा बाळासाहेबांचा उल्लेख करुन शिवसेनेला डिवचलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कुछ तो गडबड है’अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची बोलकी प्रतिक्रिया !

News Desk

विधानसभा अध्यक्षपद घ्यायला मी तयारं ! पण…शिवसेनेचे भास्कर जाधव काय म्हणाले ?

News Desk

शरद पवारांच्या मनधरणीसाठी देशमुखांनी २ कोटी मागितले!

News Desk