HW News Marathi
Covid-19

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई । राज्यातून एक अत्यंत मोठी बातमी येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनी आज (२४ ऑक्टोबर) स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे”, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस हे खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून असंख्य लोकांच्या संपर्कात आलेले आहेत. बिहार निवडणुकांचे प्रभारीपद देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यानिमित्ताने एकीकडे देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकांच्या तयारीत व्यस्त आहेत. तर दुसरीकडे राज्यावर परतीच्या पावसाचे मोठे संकट आल्याने अनेक जिल्ह्यांचे, शेतकऱ्यांच्या झालेल्या अतोनात नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे बडे नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते.यावेळी देखील मोठ्या प्रमाणात ते लोकांच्या संपर्कात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली’

News Desk

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कलम १४४ लागू; अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

Aprna

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ हजार २८१, तर जगभरातील देशाच्या यादीत १२ व्या क्रमांकावर

News Desk