HW News Marathi
महाराष्ट्र

अशोक चव्हाणांनी नितीन गडकरींसारखं काम करुन दाखवावं म्हणजे स्तुती होईल, फडणवीसांचा टोला

नांदेड | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते कोकण दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी जळगाव दौरा केला. आज (२ जून) त्यांनी नांदेड, परभणी हा दौराही केला होता. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना सुनावलं आहे.

काही दिवसांपुर्वी अशोक चव्हाण म्हणाले होते की नितीन गडकरी चांगलं काम करत आहेत पण चुकीच्या पक्षात आहेत. यावरुनच फडणवीसांनी अशोक चव्हाणांना पलटवार करत म्हटलं आहे की, आधी तुम्ही गडकरींसारख काम करुन दाखवा मग तुमची स्तुती होईल. देवेंद्र फडणवीसांनी हा खोचक सल्लाच जणू दिला आहे.

तसेच, मराठा आरक्षणासाठी केलेल्या सर्व्हच्या संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र फडवणीस असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावरुनच आता फडवणीस यांनी काँग्रेससह राज्य सरकार वर सडकून टीका केली आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की राज्य सरकारला आरक्षण टिकवता आले नाही त्यामुळे ते अकलेचे तारे तोडत आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

नुकतंच मोदी सरकारला सत्तेत येऊन ७ वर्ष पुर्ण झाली. याच पार्श्वभूमिवर कॉंग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली होती. कॉंग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरी यांच्याबद्दल भाष्य केले होते. केंद्रातील भाजप सरकारची एकूणच कामगिरी उणेच असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळातील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे ‘ चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस’ असे त्यांचे वर्णन करावे लागेल, असे मत अशोक चव्हाण यांनी केले होते.

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कारभाराचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. नोटबंदी, जीएसटी याचबरोबर करोना हाताळणीत केलेल्या चुकांमुळे ‘ गंगा मैली’ झाल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. लसीकरणातही केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही वेळ आणीबाणीची, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – राज ठाकरे

News Desk

वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू, शेताच्या बांधावर जाऊन विजय वडेट्टीवार यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

News Desk

जर काँग्रेसचे विचार स्वीकारुन खडसे आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करु

News Desk