मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेले काही दिवस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. अशात त्यांच्या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मी घरची धूनी रस्त्यावर धुत नाही असे म्हणत त्यांनी खडसेंना टोला लगावला आहे. मराठवाडा, कोकणातून प्रत्येकी तीन मुख्यमंत्री झाले. मात्र उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आला, त्याला बाजूला सारले गेले अशी खंत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. त्याचवेळी मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि आज त्यांचे नाव घेत त्यांच्यामुळे त्रास झाला. असेही खडसे काल (१० सप्टेंबर) म्हटले.
जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमावेळी खडसेंनी आपले मनोगत मांडले. कीखडसे यांच्या या आरोपांना उत्तर देण्याचे फडणवीस यांनी टाळले असून ‘मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही’, असा टोला देखील फडणवीसांचा खडसेंना लगावला आहे. हॅकर मनीष भंगाळे प्रकरणात एकनाथ खडसे यांनी क्लीन चिट देण्यात आली होती. तर ते आमचे जेष्ठ नेते मी त्यांच्यावर आरोप करणार नाही त्यांच्या काही तक्रारी असतील त्या घरात बसून दूर करू अस देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.