HW News Marathi
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची बदली मला त्रास देण्यासाठी केली असेल तर…फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई | नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविषयी राजकीय वर्तृळात चर्चा सुरु आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे,तसेच, “तुकाराम मुंढे काय कुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केल्यापासून नागपुरात आयुक्त विरुद्ध भाजपा असा वाद निर्माण झाला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रकरणात लक्ष घातले होते. दरम्यान, अचानक तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. मुंढे यांच्या बदलीविषयी विरोधी पक्षनेते फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

”मला त्रास देण्यासाठीच त्यांची नियुक्ती केली जरी असेल, तरी माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. याचं कारण म्हणजे माझी दोन नंबरची कामं नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे काय किंवा अन्य कुणीही अधिकारी आला तरी मला फरक पडत नाही. हे सरकार सुडाचं राजकारण करत आहे,” असा आरोप फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला आहे.

“शेतकरी विधेयकांची अमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे. हे निव्वळ राजकारण आहे. हे इतके दुटप्पी आहेत की,काँग्रेसनं निवडणूक जाहीरनाम्यात ‘आम्ही जर सत्तेत आलो तर हे करू’ असं म्हटलं होतं. जर सत्तेत आलो नाही, तर हे करू देणार नाही, असंही म्हणायला हवं होतं. आता शेतकरी उत्तर देतील. त्यांना अमलबजावणी करावी लागेल,” अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुत्र्याचे मटन खाणाऱ्या दोघांना अटक

News Desk

राज्य सरकारसह अनिल देशमुखांना हायकोर्टाने दिला दणका; आव्हान याचिका फेटाळली

News Desk

“मी गायब होणारा नेता नाही”, मुंबै बँक घोटाळ्याच्या आरोपांवरुन दरेकरांनी विरोधकांना ठणकावलं

News Desk