नवी दिल्ली | विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(२३ मार्च) दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी गृह सचिवांना ६.३ जीबीचा कॉल रेकॉर्डींग डाटा एका बंद पाकिटात दिला. आयपीएस आणि नॉन-आयपीएस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भातील रॅकेटची काही कागदपत्रेही दिली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आपण केंद्रीय गृह सचिवांकडे एका बंद पाकीटात सर्व पुरावे दिले आहेत. तसंच त्यांच्याकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाची नक्कीच दखल घेऊ आणि सरकार या प्रकरणी योग्य ती करावाई करेल, असं आश्वासन त्यांनी दिल्याचं फडणवीस यांनी गृह सचिवांच्या भेटीनंतर सांगितलं.तसेच, गरच पडल्यास या प्रकरणी कोर्टात देखील जाऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. दरम्यान, “डीजीपींनी सरकारला सादर केलेले काही इंटरसेप्ट्स स्वत: मुख्यमंत्र्यांनी देखील ऐकले होते, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
फोन टॅपिंग प्रकरणातील पुरावे आपण गृह सचिवांना दिले आहेत. २५ ऑगस्टपासून अहवाल का लपवण्यात आला? सीआयडी चौकशी का थांबवली गेली? राज्यातील ठाकरे सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? या प्रकरणी कोर्टात जाण्याची आपली तयारी आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Delhi: BJP leader Devendra Fadnavis arrives at MHA.
He had sought time from Union Home Secretary to meet him and hand him over 6.3 GB of data of call recordings and some documents pertaining to alleged transfer posting racket of IPS and non-IPS officers of Maharashtra Police. pic.twitter.com/SvdPl4J9Gd
— ANI (@ANI) March 23, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.