HW News Marathi
Covid-19

हा तर महिन्याभराचा अघोषित लॉकडाऊन! – देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. यात शुर्कवार ते सोमवारी सकाळपर्यंत कडक निर्बंध असणार आहेत. तर सोमवार ते गुरुवार संध्याकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. आणि सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी असणार आहे. दरम्यान, सरकारने जी नियमावली जारी केली आहे त्यामुळे लोकांचा मोठा संभ्रम झाला आहे. नेमकी काय सुरु आणि काय बंद असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांमी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी सरकारने अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच लावला असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, हा मिनी लॉकडाऊन लावण्याआधी मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना फोन केला होता आणि सहकार्याची अपेक्षा केली होती. याचा उल्लेख फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना आज लिहिलेल्या पत्रात केला आहे. राज्यात ोकोरनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कठोक निर्बंध लावावे लागतील यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. २ दिवसांच्या लॉकडाऊनचा प्रश्न असल्याने आम्ही सहमती दर्शवली होती. मात्र, इतर ५ दिवसही लॉकडाऊन सदृश्य निर्बंध घालण्यात आले त्यामुळे जनमाणसात अस्वस्थता निर्माण झाली.

दरम्यान, ज्या प्रकारे निर्बंध घालण्यात आले आहेत हा एक प्रकारचा महिनाभराचा लॉकडाऊनचं आहे. यात सरकारने छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केशकर्तनालय अशा अनेक छोच्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या छोट्या घटकांशी चर्चा करुन त्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी विनंतीही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून राज्यभर रात्री ८ नंतर जमावबंदी, राज्याकडून गाईडलाईन जारी

News Desk

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार २२८ पार, तर ३८०० जण बरे होऊन घरी

News Desk

राज्यात आज नव्या ५,३१८ कोरोनाबाधितांची नोंद

News Desk