HW News Marathi
महाराष्ट्र

आता तरी ओला दुष्काळ जाहीर करा, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी

पाटणा | शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तेथे ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.देवेंद्र फडणवीसांनी यासंबंधी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून थेट मदत मिळणं गरजेचं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पिकांना कोंब फुटली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अनेक तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, परळी तालुक्याला मोठा फटका बसला आहे. पीक काढणीचे काम सुरू असतानाच हा तुफान पाऊस झाल्याने आता शेतकर्‍यांच्या हाती पीक लागणार नाही. सोयाबीनच्या लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी स्थिती आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्‍यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर तो टाहो फोडून ओरडत आहे.

मदतीसाठी आर्जव करीत आहे आणि जुनीच मदत मिळाली नसल्याने आता जगायचे तरी कसे, असा त्याचा प्रश्न आहे. जवळपास अशीच स्थिती विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. भंडारा-गडचिरोली-गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भातपीकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर जवळपास 10-12 दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. धान, सोयाबीन अशा दोन्ही पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला कोंब आणि कपाशीला बुरशी म्हणजे कोणतेच पीक हाती नाही. ज्वारी सुद्धा मातीमोल झाली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत…!

News Desk

चंद्रकांत पाटील यांनी सामानाच्या रोखठोक सदरासाठी संजय राऊत यांना सुचवले मुद्दे

News Desk

एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही!

News Desk