HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका – देवेंद्र फडणीस

पंढरपूर | आज (१९ ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर पंतप्रधन पण बाहेर पडतील असे मुख्यमंत्री म्हणाले होते.त्यांच्या या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज माढा आणि करमाळा दौऱ्यावर आले होते.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील आहे. या कठीण समयी लोकांना तुम्ही काय मदत करता हे अपेक्षित आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे थिल्लरबाजी करणे त्यांना शोभत नाही. मोदीजी थेट लडाखला जातात, त्यामुळे उगाच स्वत:ची तुलना करु नये. आज मुख्यमंत्री थोडावेळ बाहेर पडले. काही तासांचा त्यांनी प्रवास केलाय, मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इतर गोष्टी सोडून राज्य सरकार आता काय मदत करते याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. केंद्र सरकार मदत करेलच यात शंका नाही. मोदींनी स्वत फोन करुन त्यांना सांगितले की काही मदत लागली तर सांगा. मात्र अशा गंभीर दौऱ्यात अशा प्रकारचं थिल्लर वक्तव्य करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“केंद्र सरकारने कुठलेही पैसे अडकवले नाहीत. तुमचा जीएसटी कमी आला तो कंद्र सरकार कर्ज काढून देत आहे. राज्य सरकार केवळ टोलवाटोलवी करत आहे. काहीही झालं की केंद्र सरकारवर बोट दाखवायचं. राज्य चालवायला हिम्मत लागते. लोकांची उगाच दिशाभूल करु नका. नुकसान भरपाईचे बोला. हिम्मतीने काम करावे लागते. सरकारला मदत करायची नाही आहे आणि त्यामुळे केंद्राकडे, याच्या कडे त्याच्या कडे बोट दाखवत आहेत. १ लाख २० हजार कोटींचं कर्ज काढू शकतो, मग का काढत नाहीत?. सरकारने लोकांची दिशाभूल करु नये”, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

“देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं. असंही ते बिहारला जातच आहेत, दिल्लीतही जावं”, असे मिश्किल उत्तर देत खरमरीत टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता थेट शेतकरी मोबाईल ॲपद्वारे करणार पिकांची नोंदणी, बाळासाहेब थोरातांची माहिती!

News Desk

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी होणार

News Desk

‘फडणवीस सरकारचे चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीसही अडचणीत येतील’, पटोलेंचा गौप्यस्फोट

News Desk