HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात मोगलाई आहे काय? शिवजयंतीवर लागू केलेल्या निर्बंधांवरून फडणवीसांचा संताप

नागपूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून राज्यातील अनेक सण, उत्सव हे साधेपणाने साजरे केले जात आहेत. दरम्यान, आज (१९ फेब्रुवारी) साजऱ्या होत असलेला शिवजयंती सोहळाही अनेक निर्बंधांसह साजरा होत आहे. दरम्यान, शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध आणल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोगलाईशी तुलना केली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवरायांचा कार्यक्रम करायचा म्हटलं तर राज्यात १४४ कलम लावलं जातं. राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. मग शिवरायांच्या कार्यक्रमांवरच बंदी का? असा सवालही त्यांनी केला.

लोकं सर्व काळजी घेऊन शिवजयंती साजरी करत असतात. आम्हीही शिवजयंती साजरी करत राहू, असं सांगतानाच कोरोनात जनतेच्या पाठिशी उभं राहणं सोडून ७५ लाख लोकांचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी नोटिसा बजावल्या जातात. शिवजयंतीवर बंधनं आणली जातात. ही काय मोगलाई आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला.

अधिवेशन वादळी होणार

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवशेन येत्या १ मार्चपासून सुरू होत आहे. ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र, अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी येत्या २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस बोलत होते. आगामी अधिवेशनात वीज कनेक्शनसह अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत. या मुद्द्यांवर सरकारला घेरलं जाईल, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन वादळी होणार असल्याचे स्पष्ट केलं. तसेच अधिवेशनाचा कालावधी गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. जर या सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी केला तर सरकार प्रश्नांपासून पळ काढत आहे, असा त्याचा अर्थ होईल, असं सांगतानाच अधिवशेन किमान चार आठवड्याचं असावं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मुंबईत दाखल

News Desk

कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करणारं शरद पवारांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल  

News Desk

“आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा”, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला

News Desk