HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेना फोन, तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा दिला सल्ला

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भगिनी व माजी मंत्री पंकजाताई मुंडे या आजारी असल्याचे समजताच त्यांना फोन करून तब्येतीची विचारपुस केली आहे. पंकजाताई मुंडे यांना ताप खोकला असून त्यांनी स्वतः ट्विट करून आयोसेलट झाल्याबाबतची माहिती दिली होती.

जून महिन्यात धनंजय मुंडे हे कोरोनाचा सामना करून, त्यावर मात करून परत आले. या आजारात होणार त्रास मी अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला असल्याचे समजते.

पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या होम आयसोलाटेड आहेत.

 

पंकजा मुंडे यांनी कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोन वरून दिला आहे, तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकरांकडून दिलगिरी व्यक्त

swarit

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये जशी फूट पडली तशी महाराष्ट्रात मोठी फूट पाहायला मिळेल – सदाभाऊ खोत

News Desk

सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला; एन.डी. पाटलांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

News Desk