HW News Marathi
देश / विदेश

धनंजय मुडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, हात उंचावून मानले सर्वांचे आभार !

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कोरोनामुक्त झाले आहेत  आज ( २१ जून) ला दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मागील अकरा दिवसांपासून ते या रुग्णालयात कोरोनाच्य आजारामुळे दाखल होते .

दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले

मुंडे यांच्यासोबत करोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे .

आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशवासियांना संबोधित करणार

News Desk

वारीस पठाणांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधेरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल

swarit

‘ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा द्यावा’, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

News Desk