बीड | माजी मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळ्या प्रकरणात, आता नवा ट्विस्ट आला आहे. मुंबई हायकोर्टाने अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे.यावर धनंजय मुंडे यांनी माझी मागणी कोर्टाने लक्षात घेतली आहे आधी पासून मी सांगत होतो गुन्हा दाखल करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टात देखील गेले होते त्यामुळे आता सर्व बाब कोर्टाच्या हळू हळु लक्षात येत आहे.
सखोल चौकशी झाली पाहिजे
चिक्की घोटाळा आता पुन्हा डोकं वर करू लागला आहे. “चिक्की घोटाळा निघाल्यापासून माझी सातत्याने मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि आज नाही दोन वर्षा पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एसीबी कडे अर्ज केला आहे. सगळा विषय कोर्टात आहे त्यामुळे माननीय कोर्ट काय निर्णय घेईल ते पाहू” असा मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
काय आहे प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना वाटली जाणारी चिक्की निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यात अत्यंत खळबळजनक माहिती उजेडात आली होती. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एका दिवसात चिक्की, चटई, डिश, पुस्तकं इत्यादी वस्तूंची तब्बल २०६ कोटींची खरेदी केल्याचे समोर आले होते. या खरेदीसाठी एका दिवसात २४ आदेश काढल्याचाही आरोप झाला होता. या खरेदीत नियमभंग केल्याचाही आरोप झाला होता. याचं कारण ३ लाख रुपयांच्यावरची खरेदी ई-टेंडरद्वारे करण्याचा नियम आहे.
दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिले होते. शिवाय, हे आरोप खोटे आणि राजकीय असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनीही पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दिली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.