HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना दिलेल्या धमक्यांचे व्हिडिओ बाहेर काढायला लावू नका, धनंजय मुंडेंचा फडणवीसांना इशारा

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सरकारच्या कामावर ताशेरे ओढले जात आहे. त्याचाच भाग म्हणून  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत, ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत, धमकी देणारा मुख्यमंत्री आपण पाहिला नसल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. फडणवीसांच्या या टीकेला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका’, असा इशाराच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. ‘उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे’, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“महाविकास आघाडी सरकारला 1१ वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.

“हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता. ही मुलाखत मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नव्हती”, असं फडणवीस म्हणाले.

Related posts

अजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे सामनातून टीका

News Desk

#CoronaVirus : घाबरून युद्ध जिंकता येत नाही, आपण जिद्दीने लढू !

अपर्णा गोतपागर

२० एप्रिलपासून राज्यातील ठराविक भागांत एसटी-बेस्ट वाहतूक सुरु होणार

Gauri Tilekar