बीड | बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिवर आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्य सरकारने बीडला कमी डोस दिले आहेत, यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे.
दरम्यान, बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहित आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे.
“ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल!”, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची फिरकी घेत खरपूस समाचार घेतला.कोरोनाच्या मुद्यावरून मुंडे बहीण भाऊ पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात शाब्दिक चकमकी होताना दिसून येत आहे.
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! @Pankajamunde @DrPritamMunde
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या २ लाख पैकी बीडलाही पुरेशा लसी मिळाल्या पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले आहे.
#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत. pic.twitter.com/30Bi8lu7mj
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 15, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.