HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका

बीड  | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा जास्त परिणाम हा महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगारांना भोगावा लागला आहे. कोल्हापूरातील शिरोळ येथे झालेल्या अवकाळी पावसामूळे या कामगारांची घरे गेली, त्यांच्या अन्नात चिखल पडायला लागल्याने बीडच्या माजी पालकमींत्री पंकजा मुंडेंही आज आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान, बीडचे आत्ताचे पालकमंत्री धनंजय मुंडे या ऊसतोड कामगारांसाठी काय पाऊल उचलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

या ऊसतोड कामगारांसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या ऊसतोड मजुरांचे नुकसान झाले. माझ्या सूचनेवरून प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासह कारखान्याचे एमडी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, मजुरांची योग्य व्यवस्था केली, असे ट्विटही त्यांनी केले आहे.

तसेच, अधिक नुकसान झालेल्या ऊसतोड मजुरांना त्वरित शिरोळ येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्थलांतरित केले असून त्यांना जीवनावश्यक वस्तू, किराणा आदीही पुरवण्यात आली आहे. ऊसतोड मजुरांची गैरसोय होऊ नये यासाठी कोल्हापूर शुगर कमिशनर, जिल्हाधिकारी, प्रांत तहसीलदार यांच्याशी धनंजय मुंडे संपर्कातही आहेत. दरम्यान, ऊसतोड कामगारांची संख्या, त्यांची आरोग्य तपासणी, गावकऱ्यांची सुरक्षा याचा विचार करून येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Related posts

सेना-भाजपमध्ये युतीचा तिढा अखेर सुटला ?

News Desk

…तरीही वरिष्ठ नेत्यांना पराभवाची जबाबदारी स्वीकारावीशी वाटली नाही !

News Desk

शिवसेना-भाजपमधील तिढा सुटेपर्यंत ‘मला मुख्यमंत्री करा’, शेतकरी पुत्राचे राज्यपालांना पत्र

News Desk