HW Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांचा एक दिवसीय शहापूर तालुक्याचा दुष्काळी दौरा

मुंबई | राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाने आचार संहिता शिथील केली आहे. यानंतर अनेक नेत्यांनी दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे ट्याकर पुरवून जनतेची ताहान भागवित आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे उद्या (२२ मे) ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. या भागात सध्या पाणीटंचाईची मोठ्या समस्येला जनतेला तोंड द्यावे लागत आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे बहुतांश धरणे ही शहापूर तालुक्यात आहेत. परंतु या धरणातून शहापूर तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नाही, अशी आज परिस्थिती आहे. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थितीत त्यामुळे या भागातील जनतेला पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत असून जनतेत मोठ्या प्रमाणावर उद्रेक निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे  या भागाचा दौरा करणार आहेत. एका दिवसात ते तब्बल १३ गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांची संवाद साधणार आहेत. या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग वरोरा हे ही त्यांच्यासोबत असणार आहेत.

या दौ-यात ते पेठेचा पाडा, आंब्याचा पाडा, ठेंगनमाळ, तेलमपाडा, पाटोळपाडा, ढाकणे, धुपारवाडी, रोड वडाळ, जाम्भूळ पाडा, बाबरेवाडी, पोकळवाडी, जळकेवाडी, कोठारे या १३ गावांना भेटी देणार असून सकाळी ११ वाजल्या पासून या दौ-यास सुरुवात होणार आहे.

Related posts

डॉ. आंबेडकराचे परळमधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित

News Desk

मुख्यमंत्र्यांचा हा पुणे दौरा म्हणजे फक्त दिखावा !

News Desk

जर सूडाचं राजकारण केलं जात असेल…

rasika shinde