HW News Marathi
देश / विदेश

धनंजय मुंडेंचे पीए,चालक कोरोनामुक्त ! मुंडेंसुद्धा दोन दिवसांत कोरोनामुक्त होतील…

बीड : सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक, वाहन चालक व इतर तिघे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. बीडमध्ये आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७७ झाली आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, वाहन चालक ,त्यांचा स्वयंपाकी असे पाच जण मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांपैकी चालक व स्वीय सहायकाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच बीड शहरातील मसरत नगर भागातील कोरोनामुक्त तिघांना घरी पाठवण्यात आले आहे. दोन दिवसांत पाच जण बीडमध्ये कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण ९८ बाधितांपैकी ७७ जण कोरोनामुक्त झालेले आहेत. चौघांचा मृत्यू झाला आहे.

सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री यांनाही दोन दिवसात सुट्टी

पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यामुळे त्यांना येत्या दोन दिवसात रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पारंपरिक सोने खरेदीला छेद, ऑनलाइन बाजारात सोन्याला झळाळी

News Desk

पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत- सामना

News Desk

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर

News Desk