HW News Marathi
महाराष्ट्र

Dhangar Reservation । सरकारने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले !

मुंबई | धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते केवळ निवडणुकीसाठी गाजरे दाखवण्याचे काम भाजपने केले आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (२६ फेब्रुवारी) सभागृहात केले आहे. भाजपच्या मनात असते तर २०१६ मध्येच लोकसभेत ३२५ क्रमांकाचे बिल आले. त्याचवेळी धनगर आरक्षण मंजुर करुन घेतले असते परंतु तसे करण्यात आले नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न औचित्याच्या मुद्दयाद्वारे धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. यावेळी सरकारच्या आश्वासनावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

धनगर आरक्षणाबाबत आमदार रामराव वडकुते आणि आमदार रामहरी रुपन या दोन्ही आमदारांनी हा विषय उचलून धरला. त्यावेळी सभागृहात सरकारकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. धनगर आरक्षण प्रश्नी सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिवसभरासाठी तहकूब केले.

मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपुर्वी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते त्याची आठवण धनंजय मुंडे यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांना करून दिली. आता साडे चार वर्ष उलटून गेली, शेकडो कॅबिनेट झाल्या परंतु मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही. २०१६ मध्ये लोकसभेत ३२५ क्रमांकाचे बिल आले होते. त्या बिलाला राज्यातील १८ खासदारांनी धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करावी सुचवली होती असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. केंद्रसरकारने कलम ३४२ अंतर्गत निर्गमित केलेल्या आदिवासींच्या यादीत बदल करावा, धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करावी अशा प्रकारची शिफारस सभागृहाने करावी आणि या प्रकरणाचा ठरावही घ्यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. राज्य सरकारला धनगर समाजाला आरक्षण देता येत नसेल तर त्यांनी एक सर्वपक्षीय ठराव मांडावा, तो एकमताने पारीत करून केंद्राकडे पाठवावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रत्येकाला न्याय मिळेल असा विश्वास देणे गरजेचे! – उद्धव ठाकरे

Aprna

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत !

News Desk

ED कडून खडसेंनी तब्बल 9 तास चौकशी ! बाहेर पडल्यावर काय दिली प्रतिक्रिया ?

News Desk