HW News Marathi
महाराष्ट्र

धवलसिंहांनी बिबट्याला टिपलं तसं आता भाजपला टिपणार – धीरज देशमुख

मुंबई | भाजपचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आज (२८ जानेवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकारमंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पूत्र आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, धीरज देशमुख हे नेते उपस्थित होते.

डॉ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र राष्ट्रवादीने आपली दखल न घेतल्याची खंत व्यक्त करत धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसचा हात हाती धरण्याचा निर्णय घेतला. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे विचार कधी संपणार नाही – धीरज देशमुख

धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रेस नेते धीरज देशमुख यांना वडील आणि माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांची आठवण आली. “काँग्रेसचे विचार कधी संपणार नाही, असे विलासराव नेहमी म्हणत होते. भलेभले संपणार पण कॉंग्रेस संपणार नाही, असे विलासराव देशमुख नेहमी सांगायचे. धवलसिंह मोहित पाटील यांच्याकडून कॉंग्रेसला बळ मिळणार आहे. सोलापूरमध्ये कॉंग्रेसची ताकद वाढणार आहे. धवलसिंह यांनी ज्याप्रमाणे बिबट्याची शिकार केले,त्याचप्रकारे ते भाजपची शिकार करतील,” अशी प्रतिक्रिया धीरज देशमुख यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुखोई ३०-२१० हे विमान नाशिकमध्ये कोसळले

News Desk

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, ह्या ५ कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

News Desk

एसटी महामंडळाच्या चालक-वाहक पदासाठी ४२ हजार अर्ज

News Desk