HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राची लेक UPSC मध्ये देशात चौथ्या क्रमवार!

धुळे | UPSC परीक्षेत धुळ्याच्या मुलीने बाजी मारली आहे. धुळे जिल्ह्यातील फागणे गावाच्या हर्षदा छाजेड या जिद्दी मुलीने दाखवून दिले आहे. वडिलांचे छत्र हरवले असताना हर्षदा छाजेड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत म्हणजेच आयएसएस परीक्षेत देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्र राज्यात या मराठमोळ्या हर्षदा छाजेड हिनं पहिला क्रमांक पटकविला आहे. या घवघवीत यशाबद्दल फागणे गावाच्या ग्रामस्थांची मान अभिमानाने उंचावली आहे.

जिद्द आणि चिकाटी हवी

जिद्द आणि चिकाटी असेल तर आयुष्यात सगळं शक्य आहे. याचंच उदाहरण म्हणजे धुळ्याची हर्षदा छाजेड आहे. एकीकडे भ्रूणहत्या होत असताना मुलींना कमी लेखलं जातं! मात्र ,हर्षदा हिने घवघवीत यश मिळवून देशामध्ये एक इतिहास रचला आहे.त्यामुळे मुली देखील आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन पुढे जात असल्याचं तिने दाखवून दिलं आहे. धुळे जिल्ह्यातून जयहिंद कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतुन एम एस सी करत प्रथम क्रमांकाने गोल्ड मेडल प्राप्त केले होते. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यातील जितो प्रशासकीय ट्रेनिंग फाऊंडेशन सेंटरमध्ये प्रवेश घेत तयारी सुरु केली. २०१९ मध्ये प्रथम परीक्षा दिल्यानंतर हर्षदा परीक्षा पास झाली. मात्र, इंटरव्यू मध्ये काही मार्क मुळे अपयश आले आहे.

पुन्हा जोमाने यूपीएससीची परीक्षा दिली

हर्षदा हिने हार न मानता कुटुंबाच्या सदस्यांचा पाठिंबा मुळे पुन्हा जोमाने जिद्दीने अभ्यास करून ऑक्टोंबर २०२० मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. २०२१ मध्ये मुलाखतीमध्ये जुनी उणीव भरुन काढत हर्षदा हिने घवघवीत यश मिळविले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी आय एस एस परीक्षेत देशात चौथा क्रमांक तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक या मुलीने फडकविला आहे. त्यामुळे सर्वत्र या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

.तर २०१९ मध्ये भाजप सत्तेतून हद्दपार

News Desk

शिवसेना मंत्री-नेत्यांची तातडीची बैठक, उद्धव ठाकरे राठोडांबाबत कठोर निर्णय घेणार ?

News Desk

राज्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही। मुख्यमंत्री

News Desk