HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा म्हणजे देशाला धोकाचं!- गृहमंत्री दिली वळसे पाटील 

पुणे | मराठा सामाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे. तसं एक पत्रकही सध्या चांगलेच चर्चेत आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून हे पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये देण्यात आलेला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले गृहमंत्री?

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, “ नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधातील आहे आणि व्यवस्थेच्या विरोधात जी लोकं काम करतात त्यांनी अन्य लोकांना तुम्ही आमच्यात या, संघर्ष करा असे सांगणे म्हणजे एक प्रकारे देशाच्या व्यवस्थेला आव्हान देण्यासारखेच आहे किंवा धोका निर्माण करण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्या आव्हानाचा फार विचार करण्याची गरज नाही. बाकी आपल्या लोकशाही राज्यात राज्यघटना, सरकार, न्यायालय या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवले जात आहेत.” नक्षलवादी चळवळीकडून मराठा समाजातील तरुणांना त्यांच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी आज मत मांडलं आहे.

मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा

तर, “मराठा समाजातील मूठभर दलाल, भांडवलदार मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. तेव्हा मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळय़ांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्याकरिता मैदानात उतरावे. भारतीय क्रांतीचा विजय करण्याकरिता क्रांतीला अभिप्रेत असलेल्या विचारांनी आपली ताकद मजबूत करा. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत असून तुमची वाट पाहत आहे.”, असे म्हणत माओवादी राज्य समिती सचिव सहय़ाद्री याने मराठा आरक्षणाला नक्षलींचा पाठिंबा असल्याचे म्हटलेले आहे.

यावर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. “नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात.” असं त्यांनी आवाहन केलेलं आहे.

काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे? वाचा…

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. “नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात.” भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचेच नववे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी one of the pillar of Indian Democracy असे संबोधित केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा.”

“मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्या नंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा कायम ठेवला आहे. आजही मराठा समाज या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राचे हे सह्याद्री पुत्र हिमालयाचे रक्षण करण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून सीमेवर उभे आहेत. मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत. न्यायालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च इ. मार्ग आम्ही स्विकारत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चांची दखल घेतली होती. शिवाजी महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेच्या आजच्या बैठकीत राज ठाकरेंची सुनही उपस्थित

News Desk

अजित पवारांनी झोप कमी करावी आणि झेपत नसेल तर… चंद्रकांत पाटलांचा खरमरीत टोला!

News Desk

#SushantSinghRajputDeathCase – सर्वसामान्यांसाठी मुंबई सुरक्षित नाही, अमृता फडणवीस यांची टिका

News Desk