HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; तणावाचे वातावरण

मुंबई | पेगॅसस सॉफ्टवेअरवरून वाद सुरु झाला असून त्याच्या निषेधार्थ मुंबईतील दादर परिसरात भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयासमोर काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. मात्र, काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळताच यावेळी भाजप कार्यकर्ते आणि नेते देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा सुरू झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय.

पेगॅससच्या मुद्य्यावरून काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज थेट भाजपच्या दादरमधील कार्यालयसमोर आंदोलन सुरू केलं. मात्र, या आंदोलनाला भाजपा कार्यकर्त्यांनी व नेत्यांनीही विरोध दर्शवला असून भाजप आणि काँग्रेस आमनेसमाने आल्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला होता. काँग्रेसचा मोर्चा वसंत स्मृतीच्या दिशेने येत असल्याचं समजताच भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि प्रसाद लाड तसेच भाजपचे कार्यकर्ते सुद्धा घटनास्थळी जमा झाले.

दरम्यान, पोलीसही या ठिकाणी दाखल झाले असून त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वसंत स्मृतीपासून काही अंतरावर अडवलं. यावेळी दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तसेच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. आंदोलक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी काही वेळापूर्वीच आमदार झिशान सिद्दिकी आणि मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, अजूनही या परिसरात तणावाचं वातावरण आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे होर्डिंग अपघात प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Gauri Tilekar

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

News Desk

परळीत एका महिलेचा खून; अवघ्या ४ तासांत आरोपी ताब्यात

News Desk