HW News Marathi
Covid-19

राज्यात ६५ लाख ५५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप, छगन भुजबळ यांची माहिती

 

– अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 26 : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून १ ते २६ एप्रिल या सव्वीस दिवसात राज्यातील १ कोटी ५३ लाख ६४ हजार 769 शिधापत्रिकाधारकांना तब्बल ६५ लाख ५५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज (२६ एप्रिल) दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे २० लाख २८ हजार ६१६ क्विंटल गहू, १५ लाख ६७ हजार १२१ क्विंटल तांदूळ, तर १९ हजार ३०५ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.

त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ८ लाख ३२ हजार ७३९ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे. त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. ३ एप्रिलपासून एकूण १ कोटी २९ लाख ११ हजार ६९६ रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ५ कोटी ८६ लाख ३३ हजार ०६० लोकसंख्येला २९ लाख ३१ हजार ६५० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. या योजनेसाठी ३५ लाख ८२० क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

राज्य शासनाने कोविड-१९ च्या संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६ APL केशरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो)

देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप २४ एप्रिल पासून सुरू होऊन २८ हजार ०९० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यातील बाळकुम-साकेत येथे १०२४ बेड्सचे कोविड-१९ रुग्णालय उभारले

News Desk

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येने ओलांडला ४० हजारांचा टप्पा

News Desk

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा

News Desk