HW News Marathi
महाराष्ट्र

पीडितेवर अंत्यसंस्कारापूर्वी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून कुटुंबियांना मदतीचे लेखी आश्वासन

वर्धा | हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पीडित तरुणीने आज (१० फेब्रुवारी) सकाळी ६ वाजून ५५ मिनिटने ऑरेंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. पीडित तरुणीच्या मृत्यूशी माहिती मिळाल्यानंतर दारोडा तिच्या गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थानी सर्व दुकाने बंद करत चंद्रपूर आणि नागपूरमध्ये रस्तारोक केला. यानंतर तरुणीच्या पार्थिवावर सायंकाळी ५ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

पीडितेच्या स्मशानभूमीत आणल्यानंतर ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार थांबवले. जोपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे लेखी आश्वास देत नाही. तोपर्यंत पीडितेवर अत्यंसंस्कार करण्यात येणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी दिलेल्या लेखी आश्वासन दिले आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पीडितेच्या कुटुंबाला ही तीन आश्वासन देण्यात आली.

उपजिल्हाधिकारींनी ‘तीन’ लेखी आश्वासने लिहून दिली.

  • हिंगणघाटच्या पीडित तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. यानंतर आरोपी विकेश नगराळे यांच्या विरुद्ध फास्ट ट्रक कोर्टात प्रकरण चालवण्यात येईल
  • सदर प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज 10 फेब्रुवारीला ट्विटरवर आश्वासन दिले की, मृतकाच्या भावाला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सरकारी नोकरी देण्यात येईल. त्या अनुषंगाने मृतकाच्या भावाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सराकारी नोकरी लवकरात लवकर देण्यात येईल.
  • मृतकाच्या कुटुंबियाला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात येते.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाबद्दल माहिती

नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला पीडित तरुणी हिंगणघाट शहरात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकवरून जात होती. यावेळी आरोपी विक्की नगराळे तिचा तिचा पाठलाग करत होता. आरोपीने पीडितेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेज रुग्णालयात उपचार सरू असून पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…की अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनतील”; काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

News Desk

आता पोलीस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मुंबईत हक्काचे घर

News Desk

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार हरला तर त्याला शिवसेना जबाबदार असेल!

News Desk