HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी उत्सव नको, बॅनर्स, होर्डिंग लावू नका, भाजपने केलं आवाहन

मुंबई | विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी म्हणजेच येत्या गुरुवारी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही जाहिरात, होर्डिंग्स, उत्सव नको असल्याचं सांगण्यात आलं आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षाचे कोणत्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच वृत्तपत्र, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करु नयेत असं आवाहन केलं आहे.

यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजप पक्षातर्फे करण्यात आलं आहे. एवढंच काय तर होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असं भाजप पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

सेवाकार्यात योगदान द्या

होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजपकडून करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘‘भाजप-सेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे’, सदाभाऊंचा घणाघात!

News Desk

अखेर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना ‘होम क्वारंटाइन’मध्ये ठेवले

News Desk

महाराष्ट्रात १० हजार पोलिसभरती करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

News Desk