HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या…संभाजी महाराजांबद्दलच्या काही अज्ञात, पण रंजक गोष्टी

शिवाजीचा छावा, धर्मवीर, स्वराज्यरक्षणकर्ते, संस्कृत भाषेचे पंडित आणि अशी अनेक नामाबिरुदे मिरवणाऱ्या संभाजी महाराजांच्या आज जन्म दिन आहे. संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. भाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. वादळाप्रमाणे शत्रूवर चाल करून जायची, त्यांची पद्धत गजब होती. जाणून घेऊया पराक्रमी संभाजी महाराजांबद्दलच्या काही अज्ञात, पण रंजक गोष्टी जाणून घ्या

​संस्कृत भाषेवर संभाजी महाराजांचे विशेष प्रभूत्व

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच संभाजी महाराजांना मिळाले. संभाजी राजे अभ्यासात अत्यंत हुशार होते. अनेक भाषा त्यांनी आत्मसाद केल्या होत्या. संस्कृत भाषेवर संभाजी महाराजांचे विशेष प्रभूत्व मिळवले होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली. संभाजी महाराजांचे सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी कलश यांच्याशी राजेंची मैत्री ही साहित्यामुळे अधिक घट्ट झाली, असे इतिहाकार सांगतात.

​संभाजी महाराजांचे घोडदळ

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजही केवळ गडावर बसून आहे. तो राज्यकारभार करण्यातले नव्हते. शिवाजी महाराजांसारखाच संभाजी राजेंनीही शूर होते. संभाजी महाराज हे शत्रूविरोधात अनेक लढा दिला आहे. गोव्याच्या मोहिमेप्रसंगी घोड्यावर बसून मांडवी नदी ओलांडली होती. गोव्यात जाऊन पोर्तुगीजाला असा सज्जड दम भरला होता की, पुन्हा पोर्तुगीज संभाजी राजेंच्या वाटेला गेला नाही. शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांकडेही जातिवंत आणि राजाप्रमाणेच शूरवीर होते.

​संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. कुशल संघटक होते. शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांना नेमले होते.

संभाजी महाराज हे ​अजेय योद्धा

छत्रपती शिवाजी महाजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य विस्तारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. गनिमी काव्याचा चपखलपणे वापर करत शत्रूंना झुंजवले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत. संभाजी राजेंची शत्रूवर चाल करून जायची पद्धत वादळी होती. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. शत्रूला ते कधीही सापडले नाहीत. मात्र, स्वकीयांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले.

​बुऱ्हाणपूर आणि रामशेज

छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजे छत्रपती झाले. संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला केला. मोठ्या फौजफाट्यासह मराठी सैन्य ७० मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. तीन दिवसापर्यंत मराठे पुरे लुटीत होते. त्यांना मुबलक लुट मिळाली. त्यांनी जडजवाहीर, सोने-नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. इतर जिन्नसाची त्यांनी परवा केली नाही. भांडीकुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे इ. सर्व लुट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून दिले व नंतर ते निघून गेले. पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाची हिंमत झाली नाही, अशी आख्यायिका आहे. शहाबुद्दीन फिरोजजंगने रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला. हा किल्ला सहज हस्तगत करता येईल, अशी मोघलांचा समज होता. मात्र, संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकडी तैनात केली. मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला ५ वर्षे झुंजवत ठेवला.

​धार्मिक धोरणकर्ते संभाजी महाराज

संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठीही भरपूर कामे केली. एवढेच नव्हे तर संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा कोरलेला आढळतो. समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी, मोरया गोसावी, समर्थ रामदास, सदानंद गोसावी यांना शिवाजी महाराजांनंतरही सर्वतोपरी मदत केली. यासह अनेकांना त्यांनी सढळ हस्ते मदत केल्याचे अनेक दाखले आपल्याला इतिहासात दिसून येत आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे म्हणजे छेद पडलेला फुगा, संजय राऊतांना अग्रलेखावरून राणेंचं सणसणीत उत्तर!

News Desk

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने ३,५०१ कोटी रुपयांची मदत

Aprna

मिलिंद एकबोटेला काळं फासण्याचा प्रयत्न

News Desk