HW News Marathi
देश / विदेश

“बिचारे डॉ. हर्षवर्धन… ‘बळीचा बकरा’ ठरले”, काँग्रेस नेत्यांचा निशाणा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल (७ जुलै) विस्तार झाला. या मंत्रिमंडळामध्ये ४३ मंत्र्यांचा समावेश असून त्यांनी काल (७ जुलै) शपथ घेतली. निवडलेल्या मंत्री आज (८ जुलै) आपल्या पदावर कार्यरत होणार आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे चारही जण वेगळ्या पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी १२ जणांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यामध्ये प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे.

“बिचारे डॉ. हर्षवर्धन… ‘बळीचा बकरा’ ठरले”

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी अनेक मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यात मुख्य नवे म्हणजे प्रकाश जावडेकर आणि डॉ. हर्षवर्धन यांची आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “बिचारे डॉ. हर्षवर्धन… ‘बळीचा बकरा’ ठरले” अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी डॉ. हर्षवर्धन यांना मोदी सरकारकडून ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

१२ मंत्र्यांकडून राजीनामा

१२ मंत्र्यांचे राजीनामे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तास आधी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद या मंत्र्यांसह १२ केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोषकुमार गंगवार, देबश्री चौधरी, रतनलाल कटारिया, संजय धोत्रे, थावरचंद गेहलोत, डी. व्ही. सदानंद गौडा, प्रतापचंद्र सारंगी,आदींचीही नावे आहेत.

‘या’ मंत्र्यांनी दिला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा ?

रमेश पोखरियाल

डॉ. हर्षवर्धन

प्रसाद जावडेकर

रविशंकर प्रसाद

थावरचंद गहलोत

बाबुल सुप्रियो

संतोष गंगवार

रावसाहेब दानवे

संजय दोत्रे

सदानंद गौडा

अश्विनी कुमार चौबे

प्रताप चंद्र सारंगी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१५ ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या नव्या मंत्र्यांना कोणत्या या सुचना?

News Desk

पिझ्झा खाणे आता धोक्याचे… पिझ्झा डिलेव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह !

News Desk

अधिकवेळा एटीएममधून पैसे काढल्यास दंड भरावा लागणार

News Desk