HW News Marathi
महाराष्ट्र

“जाणीवपूर्वक माझ्या परिवाराला छळण्याचा प्रयत्न”, ईडीच्या समन्सवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई | पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आलेलं असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आली आहे. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी आज (८ जुलै) खडसे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर खडसे चौकशीला हजर राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना मुंबईत ईडीच्या कार्यालयात एकनाथ खडसे चौकशीसाठी पोहोचले आहेत.

ईडीच्या चौकशीला हजर 

आज सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश एकनाथ खडसेंना देण्यात आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन, एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आजची पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. अशातच एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना ईडी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. चौकशी दरम्यान पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे आणि नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे. आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत मी उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे तो मुळात वादग्रस्त आहे. एमआयडीसीचा भूखंड असल्याचे सांगून अद्याप त्याचा ताबा त्यांच्याकडे नाही. भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीतर्फे केलेली नाही. आता एमआयाडीसी या जागेवर दावा करत आहे. भूखंडाबाबत मोबदला दिल्याचे एमआयडीसीने दाखवून द्यावं त्यानंतर हा प्रश्न राहणार नाही,” असे खडसे यांनी म्हटले आहे.

“मुळात खाजगी व्यवहार असल्याचे याची आधी ५ वेळा चौकशी झाली आहे. आता ५ वर्षानंतर पुन्हा ईडीच्या माध्यमातून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. मी भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतरच ही प्रक्रिया सुरु झाली. मला हेतुबद्दल शंका आहे. गेल्या ८ दिवसांपासून जळगामध्ये कुछ होने वाला हे असा मेसेज फिरत आहे याचा अर्थ कार्यकर्त्यांना याची माहिती होती. या कारवाईमागे राजकीय वास मला येतोय आणि जाणीवपुर्वक माझ्या परिवाराला छळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राजकीय हेतुने हे सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार आहे,” असे खडसे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीत काडी टाकू नका; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

Aprna

भारताला आणखी एक सुवर्ण पदक!

News Desk

“मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली, पत्र लिहिलं पण…”,राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

News Desk